Mon. May 17th, 2021

देशभरातील एअर इंडियाची उड्डाणे थांबली

एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीच्या विमानांची तांत्रिक बाबी सांभाळणारे सिता सर्व्हर डाऊन झाल्याने देशभरातील एअर इंडियाच्या विमानांची उड्डाणे थांबली आहेत. याचा फटका देशभरातील शेकडो प्रवाशांना बसला असून त्यांचा चांगलाच खोळंबा झाला आहे. सर्वर डाऊन झाल्याने प्रवाशांना बोर्डींग पासही काढता येत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. पहाटे 4 वाजल्यापासून सर्वर डाऊन झाले आहे. पुढील एका तासात सर्वर दुरुस्त होईल असं एअर इंडियाकडून सांगितलं जात आहे.

काय आहे हे ‘सिता’ सर्व्हर?

एअर इंडियाच्या आयटी आणि कम्युनिकेशन विभागामध्ये ‘सिता’ सर्व्हर अत्यंत महत्वाची यंत्रणा आहे.

पहाटे 4 वाजल्यापासून सर्वर डाऊन झाले असून देशभरातील एअर इंडियाच्या विमानांची उड्डाणे थांबली आहेत.

दिल्लीत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.

हा सर्व्हर डाऊन झाल्याने प्रवाशांना चेक इन करता येत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

या सर्व्हरमुळे इतरही तांत्रिक बाबी पूर्ण होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.

या कारणास्तव एअर इंडियाच्या दिल्ली आणि मुंबई विमानतळांसह जगभरातील प्रवाशांना या अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

पुढील एका तासात सर्वर दुरुस्त होईल असं एअर इंडियाकडून सांगितलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *