Mon. May 17th, 2021

#InternationalWomensDay :एअर इंडिया कंपनीकडून महिलांचा अनोखा सन्मान

(८ मार्च) महिला दिन सर्वच क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जात आहे. महिलांच्या कर्तुत्वाची दखल घेत महिला दिन साजरा होत आहे.

यामध्ये देशाची राष्ट्रीय विमान कंपनी म्हणून ओळखली जाणारी एअर इंडिया कंपनी अग्रेसर आहे.

महिला दिनानिमित्त या कंपनीने एक विशेष घोषणा केली आहे.

या घोषणेनूसार आज दिवसभरातील सर्व १२ आंतरराष्ट्रीय आणि ४० हून अधिक देशांतर्गत विमानांचे सारथ्य केवळ महिला पायलट करणार आहेत.

या विमानात केवळ महिला क्रू मेंबर्स ठेवण्याचं हि यावेळी सांगण्यात आलं आहे.

जगातील विमानांची धुरा महिला पायलट्सच्या हाती

आज दिवसभरातील सर्व १२ आंतरराष्ट्रीय आणि ४० हून अधिक देशांतर्गत विमानांचे सारथ्य केवळ महिला पायलट करणार आहेत.

आजच्या दिवशी जगातील कानाकोपऱ्यात जाणाऱ्या विमानांची धुरा ही महिला पायलट्सच्या हाती सोपवण्यात येणार आहे.

आज एअर इंडियाच्या दिल्ली-सिडनी, मुंबई-लंडन, दिल्ली-रोम, दिल्ली-लंडन, मुंबई-दिल्ली-शांघाई, दिल्ली-पॅरिस, मुंबई-नेवार्क, मुंबई-न्यूयॉर्क, दिल्ली-न्यूयॉर्क, दिल्ली-वॉशिंग्टन, दिल्ली-शिकागो आणि दिल्ली-सॅनफ्रान्सिस्को या विमानांची संपुर्ण जबाबदारी ही उच्च प्रशिक्षित महिलांच्या हाती असणार आहे.

एअर इंडियाने नोव्हेंबर १९८५ मध्ये असाच निर्णय घेतला होता. त्यावेळी सर्व विमानांचा ताबा महिला कॉकपिट क्रू मेंबर्सने घेतला होता. कोलकाता ते सिलचर या मार्गावरील मैत्री फ्लाईटसाठी हा निर्णय घेण्यात आला होता.

आमच्यासाठी हा अत्यंत अभिमानाचा आणि सन्मानाचा क्षण आहे.एअर इंडियाच्या महिला कर्मचारी जागतीक स्तरावर एव्हिएशन क्षेत्रात आपला ठसा उमटवतील. असे मत एअर इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अश्वनी लोहानी यांनी व्यक्त केला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *