Wed. Oct 5th, 2022

एअर स्ट्राइकाचे पुरावे केंद्र सरकारकडे सोपवले – हवाई दल प्रमुख

पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून जैशच्या तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात ३०० दहशतवादी ठार झाल्याचेही वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. भारतीय हवाई दलाने तळांवर हल्ला करण्यापूर्वी ३०० मोबाईल अॅक्टिव्ह होते अशी माहिती समोर आली होती. भारतीय हवाई दलाने हल्ला चुकीच्या जागी केला असल्याने त्याचे पुरावे दाखवा असे विरोधकांनी म्हटलं. हवाई दलाने एअर स्ट्राइकचे पुरावे केंद्र सरकारकडे सोपवले आहेत. हवाई दलाने वापरलेले बॉम्ब ८० टक्के अचूक लक्ष्यावर प्रहार केला आहे, असे हवाई दलाने अहवालात म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं ?

हवाई दलाने केलेल्या हल्ल्यावर विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केला आहे.

तसेच अनेक परदेशी प्रसारमाध्यमांनी या हल्ल्यावर प्रश्न उपस्थित केला आहे.

हवाई दलाने सरकारकडे सोपवलेले पुरावे महत्तवपूर्ण असल्याचे हवाई दल प्रमुखांनी सांगितलं आहे.

पाकिस्तानचे मेजर जनरल आसिफ गफूर यांनी हल्ल्याच्या भागाचा फोटो ट्विटरवर पोस्ट करत आमचे काही नुकसान झाले नसल्याचा दावा केला होता.

तसेच बॉम्ब हल्ल्यामध्ये झाडे आणि जंगलाचा भाग सोडून काही नुकसान झाले नसल्याचे पाकिस्तानने सांगितले आहे.

जर काही नुकसान झालं नाही मग पाकिस्तानने विमानं पाठवून प्रत्युत्तर का दिलं ? असा प्रश्न हवाई दलाच्या प्रमुख यांनी उपस्थित केला.

हवाई दलाने एअर स्ट्राइकसंबंधी १२ पानी अहवाल तयार केला आहे.

या अहवालात उपग्रहच्या सहाय्याने हाय रेसोल्युशन फोटो आणि एसएआर रडारच्या सहाय्याने घेण्यात आले आहे.

बालोकोटचा स्ट्राइक यशस्वी ठरला असल्याचे सिद्ध करण्यासाठी मोदी सरकारकडे फोटो पाठवण्यात आले, असे हवाई दलाने म्हटलं आहे.

मिराज २००० विमानातून इस्त्रायली बनावटीचे स्पाइस २००० बॉम्ब टाकण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.