Wed. May 12th, 2021

“झाडं पाडण्यासाठी AirStrike का ?”- सिद्धू

पुलवामा हल्ल्यानंतर ‘काही मोजक्या लोकांमुळे तुम्ही संपूर्ण देशाला दोष देऊ शकत नाही’, असं वादग्रस्त वक्तव्य नवज्योतसिंग सिद्धू यांनी केलं होतं. यामुळे त्यांना अनेक लोकांनी टीकाही केली. पुलवामा हल्ल्याचा बदला घेतल्यावर भारतीय हवाई दलाचे कौतुकही केले. मात्र पुन्हा  एकदा सिद्धू यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. झाडं पाडण्यासाठी एअर स्ट्राईक केले का ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

काय म्हणाले सिद्धू ?

नवज्योतसिंग सिद्धू यांनी ट्विटरवर ट्विट करून अनेक प्रश्न उपस्थित केले आहे.

भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये ३०० दहशतवादी ठार झाले आहे का ?

एअर स्ट्राईक करण्याचा नेमका काय उद्देश होता ?

निवडणुका तोंडावर असल्यामुळे हे केलं आहे का ?

भारतीय सैन्यला आणि राजकारणाला एकत्र करू नका.

भारतीय सैन्याबरोबर राजकारणाचे खेळ खेळू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *