Sat. Jan 22nd, 2022

मुंबई ते सिंधुदूर्ग चिपीपर्यंतच्या विमान प्रवासाचे डिसेंबरपर्यंतचे तिकीट फुल

  सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळातील मुंबई ते सिंधुदुर्ग हवाई प्रवास महागला आहे. मात्र तरिही मुंबई ते सिंधुदुर्ग चिपीपर्यंतचा विमान प्रवास करायचा असले प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती एअरलाईन्स सूत्रांकडून देण्यात आली आहे. मुंबई ते सिंधुदूर्ग चिपीपर्यंतचा विमान प्रवासाचे डिसेंबरपर्यंतचे तिकीट फुल झाले आहे. सिंधुदूर्ग चिपी विमानतळाचा उड्डाण योजनेत समावेश असल्यामुळे विमान प्रवासाचे तिकीट दर २५०० रुपये इतके आहे. मात्र प्रवाशांनी विमान प्रवासाचे तत्काळ तिकिट काढल्यास तिकिट दर १४ ते १५ हजार पर्यंत जाऊ शकतो.

  चिपी विमानतळ उड्डाण योजनेत असताना तिकीट दर वाढल्यामुळे प्रवाशांकडून आश्चर्य व्यक्त होत आहेत. तिकीट दर वाढले असतानाही प्रवासी सणउत्सवाच्या दरम्यान विमानाने प्रवास करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे प्रवाशांनी विमान प्रवासाची ऍडव्हान्स बुकिंग केली असून मुंबई ते सिंधुदूर्ग चिपीपर्यंतचा विमान प्रवासाचे डिसेंबरपर्यंतचे तिकीट फुल झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *