Mon. Jul 26th, 2021

‘ऐसा कैसे चलेगा खानसाहाब ?’ पुणे पोलिसांच भन्नाट Tweet व्हायरल

सोशल मीडियावर सध्या पुणे पोलिसांचं भन्नाट Tweet चांगलंच व्हायरल होत आहे. सध्या सोशल मीडियावर लोकांना आवडणाऱ्या ‘ऐसा कैसा चलेगा दीदी?’ या memes च्या धर्तीवर ऐसा कैसे चलेगा खानसहाब?’ असं Tweet केलं आहे. या ट्वीटद्वारे विनाहेल्मेट वाहन हाकणाऱ्या व्यक्तीला टोला लगावला आहे.

विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्या चालकाचा फोटो एका युझरनं पुणे पोलिसांना टॅग केला. त्यावर पुणे पोलिसांनी ‘खान साहबला कूलही व्हायचं आहे. हेअर स्टाईलही दाखवायची आहे. हिरोवाली बाईक ही चालवायची आहे.पण खानला ट्रॅफिकचे रूल पाळायचे नाही. असं कसं चालेल खान साहब ?’ असं भन्नाट ट्विट केलं आहे.

सोशल सध्या हे ट्विट चांगलच व्हायरल होत आहे. पुणे पोलिसांच्या या ट्विटला हजारो लाइक्स आणि कमेंट मिळाले आहेत. त्यामुळे पुणे पोलिसांच कौतुकही होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *