Jaimaharashtra news

कॉलरबोन तुटल्यानंतरही मोटरस्पोर्टस स्पर्धेत सहभागी, ‘ऐश्वर्या’ने जिंकला World Cup

मोटरस्पोर्ट्स खेळातला FIM वर्ल्ड कप भारतीय खेळाडू ऐश्वर्या पिस्सायने जिंकून इतिहास रचला आहे. मोटरस्पोर्ट्स वर्ल्ड कप जिंकणारी ऐश्वर्या ही पहिली भारतीय महिला आहे. 2017 साली झालेल्या मोठ्या अपघातातून सावरल्यावर तिने ही पुन्हा मोटरस्पोर्टमध्ये सहभाग घेतला आणि विश्वचषक मिळवला.

बेंगळुरूच्या 23 वर्षीय ऐश्वर्या पिस्सायने यापूर्वीही ज्युनिअर कॅटेगरीत दुसरं स्थान पटकावलं होतं.

FIM वर्ल्ड कपमध्ये दुबईमध्ये झालेल्या पहिल्या फेरीत तिने बाजी मारली होती.

पोर्तुगलमध्ये तिने तिसरं स्थान पटकावलं होतं.

स्पोनमध्ये तिनं पाचवं स्थान मिळवलं होतं.

हंगेरीत तिने चौथं स्थान पटकावलं होतं.

या स्पर्धेत ऐश्वर्याने 65 गुण मिळवले होते.

ऐश्वर्यासाठी हा विश्वचषक जिंकणं ही अभिमानास्पद गोष्ट आहेच. विशेष म्हणजे ऐश्वर्या दोन मोठ्या अपघातांमधून वाचली आहे. 2017 साली झालेला अपघात जीवघेणा ठरला असता. सुदैवाने ती बचावली. त्यानंतर ऐश्वर्याची सर्जरी झाली होती. तिचं कॉलरबोन तुटलं होतं. तेथे आता स्टीलची प्लेट आणि 7 स्क्रू तिला लावण्यात आले आहेत.  तिच्यावर 2 महिने उपचार सुरू होते. एवढ्या मोठ्या अपघातानंतर पुन्हा मोटरस्पोर्ट्समध्ये सहभागी होणं ही एक प्रेरणादायी गोष्ट आहे. मात्र केवळ ती सहभागीच झाली नाही, तर विश्वचषकही आपल्या नावावर नोंदवून इतिहास घडवलाय.

Exit mobile version