Jaimaharashtra news

अभिनेता एजाझ खानचा भाजप सरकारवर खळबळजनक आरोप

 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

‘बिग बॉस’ फेम अभिनेता एजाझ खान याने आपल्या राहत्या घरावर पोलिसांनी छापा टाकल्याचा दावा केला आहे. 

 

भाजपा सरकार मला अंमलीपदार्थ बाळगण्याच्या आरोपामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप एजाझने केला आहे.

 

याबाबत फेसबुकवर एक व्हिडीओ अपलोड करून त्याने खळबळ उडवून दिली. मात्र, मुंबई पोलिसांकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

 

बुधवारी रात्री एजाझने फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर करून खळबळ उडवून दिली. माझ्या चाहत्यांना विनंती करतो की माझ्या घराखाली जमा व्हा, तुम्हाला माहितीये माझं घर कुठंये, दाखवून द्या त्यांना मी एकटा नसून तुम्ही सर्व

माझ्यासोबत आहात.  “वा… बीजेपी सरकार…वा” असं तो या व्हिडीओत बोलत आहेत.

Exit mobile version