Thu. Dec 2nd, 2021

‘अजिंक्य’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

   राज्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले. दरम्यान चित्रपटगृहाचे दार प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आले. प्रेक्षकांना चित्रपटगृहात परवानगी मिळताच चित्रपटसृष्टीतील नवनवे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. यातच अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांचा ‘अजिंक्य’ या नव्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. येत्या १९ नोव्हेंबर रोजी ‘अंजिक्य’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

  अंजिक्य चित्रपटात अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसेच अभिनेते उदय टिकेकर, अरुण नलावडे, गणेस यादव, अनिकेत केळकर, प्रसाद जवादे, पद्मनाभ बिंब, त्रियुग मंत्री तसेच अभिनेत्री वंदना वाकनीस आणि पल्लवी पाटील हे कलाकार चित्रपटात झळकणार आहेत.

  ग्रामीण आणि शहरी भागांतील आर्थिक परिस्थितीवर ‘अजिंक्य’ हा चित्रपट आधारलेला आहे. तसेच रोहन-रोहन यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. चित्रपटात ‘अलगद अलगद’, ‘स्वप्नांना’, ‘आता तरी बोल ना’, ‘फेव्हरेट राव’ या गाण्यांनी प्रेक्षकांचे मन वेधले आहे. त्यामुळे भूषण प्रधान  आणि प्रार्थना बेहरे यांचा अजिंक्य चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो का? तसेच हा चित्रपट बॉक्सऑफिसवर किती कमाई करतो हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *