राहाणे आणि तेंडुलकरची Twitter वर ‘वडापाव पे चर्चा’

क्रिकेटर अजिंक्य रहाणे सध्या आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवतोय. नुकताच त्याने Twitter वरून वडा पाव खातानाचा फोटो पोस्ट केला आहे. फोटोसोबत कॅप्शन मध्ये तुम्हाला वडापाव कसा खायला आवडतो? असा प्रश्न चाहत्यांना विचारला आहे.

अजिंक्यच्या या फोटोवर मास्टर बास्टर सचिन तेंडुलकर तो वडापाव कसा खातो हे सांगितले.
आपल्याला वडापाव लाल चटणी, थोडी हिरवी चटणी आणि थोडी चिंचेची चटणी असेल तर आणखी आवडतो, असं उत्तर सचिन तेंडूलकरने दिलं आहे.

अजिंक्य रहाणे सध्या आपली पत्नी आणि मुलीसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. शुक्रवारी भारत अ संघाकडून अजिंक्य रहाणे श्रीलंकेला जाणार आहे. भारत दौऱ्यानंतर न्यूझिलॅ़ंड दौऱ्यांवर रवाना होणार आहे. या दौऱ्यांत भारत पाच टी20, तीन वन डे,तीन कसोटी सामने खेळणार आहे.

Exit mobile version