अजित पवार- राज ठाकरे यांच्यात भेट; दीड तास बैठक सुरू

काही दिवसांपासून मनसे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस युती करणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे आमच्याबरोबर राहणार असल्याचे वाटत नाही यामुळे महागठबंधनमध्ये मनसे नसल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुंबईत भेट घेतल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दुपारी 3 वाजताच्या सुमारास अजित पवार आणि राज ठाकरे यांची बैठक झाली.
पवार-ठाकरे यांच्यात भेट –
दादरमध्ये ठाकरे- पवार यांचे स्नेही विवेक जाधव यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली.
सुमारे दीड तास नेत्यांत ही चर्चा सुरू होती असे समजते आहे.
आगामी निवडणुकींच्या चर्चेसाठी पवार आणि ठाकरे यांच्यात ही बैठक झाली असल्याचे समोर आले आहे.
या बैठकीत नक्की काय चर्चा झाली याबाबत काही माहिती मिळाली नाही.