Mon. Aug 8th, 2022

अजित पवार का भडकले जितेंद्र आव्हाडांवर ?

मुंबई : राष्ट्रवादीचे अजित पवार आपल्या स्वभामुळे नेहमीच चर्चेत असतात. आज परत एकदा अजित पवार विधानसभेत शिरगणती दरम्यान भडकलेले पाहायला मिळाले.

महाविकास आघाडीने आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. महाविकास आघाडीच्या बाजूने 169 आमदारांनी पाठींबा दिला. तर 4 आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली.

विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी भाजप आमदारांनी सभात्याग केला. त्यामुळे विश्वासदर्शक ठरावाविरोधात एकही मत पडलं नाही. यामुळे महाआघाडीने हा विश्वादर्शक ठराव 169-0 अशा फरकाने जिंकला.

यानंतर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी नाव आणि क्रमांक सांगून ठरावाला सहमती दर्शवा, असे आदेश सर्व सदस्यांना दिले. यानंतर महाआघाडीच्या प्रत्येक आमदाराने आपल्या जागेवर उभे राहून शिरगणतीसाठी  नाव आणि अनुक्रमे नंबर घेतले.

या शिरगणती दरम्यान सभागृहात अजित पवार जितेंद्र आव्हाड यांच्यावर भडकल्याचे पाहायला मिळाले.

नक्की काय झालं ?  

शिरगणतीची सुरुवात शिवसेनेचे गटनेते आणि आमदार एकनाथ शिंदेंपासून झाली. यानंतर अनुक्रमे आमदारांनी आपल्या नावानंतर क्रमांक सांगायला सुरुवात केली.

जितेंद्र आव्हाडांचा सोळावा क्रमांक होता. मात्र त्यांची वेळ आली तेव्हा “ जितेंद्र सतिश आव्हाड, क्रमांक 20 ” असे म्हणाले. त्यानंतर पुढच्या रांगेत असलेले अजित पवार आव्हाडांवर भडकले. पवार आव्हाडांकडे हात दाखवत ‘सोळा, सोळा’ असे म्हणाले.

गोंधळलेल्या जितेंद्र आव्हाडांना आपली चूक लक्षात आल्यानंतर “सोळा, सोळा” म्हणत आपली चूक दुरुस्त केली. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. जितेंद्र आव्हाड हे कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत.   

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.