Tue. Jan 18th, 2022

राज्यात १५५११ रिक्त पदांच्या भरतीसाठी वित्त विभागाची मंजुरी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत पदे भरण्यात येणार आहेत. गट अ वर्गातील ४४१७, गट ब वर्गातील ८०३१ आणि गट क वर्गातील ३०३६ पदे भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्यातील विविध विभागातील १५,५११ रिक्त पदांची एमपीएससीकडून भरती करण्यात येणार आहे. या विभागांच्या पद भरतीसाठी वित्त विभागाने मंजुरी दिली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. २०१८ पासून विविध संवर्गातील रिक्त असलेली पदे भरली जाणार आहे. एमपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. त्याचे पडसाद विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले होते. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच या मुद्द्यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *