अजित पवारांनी ‘त्या’ विधानासाठी मागितली अण्णांची माफी…

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. या दरम्यान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अण्णा हजारे यांची माफी मागितली आहे.
video पाहा- पुन्हा एल्गार – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे
कशाबद्दल मागितली अण्णाहजारे यांची माफी?
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एका कार्यक्रमात अण्णा हजारे यांना संघाचा एजंट म्हटलं होतं.
या विधानामुळे अण्णा हजारे संतापले.
अण्णांच्या समर्थकांकडूनही या विधानाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
एवढंच नव्हे, मलिक यांच्याविरोधात खटला दाखल करण्याचंही अण्णा म्हणाले होते.
या विधानावरून गदारोळ उठल्यावर अजित पवार यांनी अण्णांची माफी मागितली.
हे देखील वाचा- अण्णा हजारेंच्या उपोषणाला आमचा पाठिंबा नाही – जयंत पाटील
“हे त्यांचं वैयक्तिक मत!”
अजित पवार यांनी माफी मागताना नवाब मलिक यांच्या विधानाशी पक्षाचा काही संबहंध नसल्याचं म्हटलं आहे.
जर मलिक यांच्या विधानाने अणा हजारे दुखावले गेले असतील, तर मी त्याबद्दल दिलगीर व्यक्त करतो.
असं पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार म्हणाले.