Jaimaharashtra news

अजित पवारांचा ट्विटरवर मोठा बदल

मुंबई : अजित पवार यांनी काल शनिवारी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी दुसऱ्यांदा शपथ घेतली. त्यानंतर आज अजित पवारांनी आपल्या ट्विटरवर मोठा बदल केला आहे. अजित पवारांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटमध्ये ‘उपमुख्यमंत्री’ असा बदल केला आहे. अजित पवारांच्या ट्विटर अकाऊंटवर हा बदल करण्याआधी ‘विधानसभा आमदार’ असा उल्लेख होता.

अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यातील आणि केंद्रातील भाजपच्या नेत्यांनी त्यांचे ट्विटरवरुन अभिनंदन केले. यासाठी अजित पवारांनी भाजप नेत्यांचे आभार मानले आहेत. अजित पवारांनी गेल्या तासाभरात जवळपास 20-25 रिट्विट केले आहेत.

काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाउंटच्या माहितीत बदल केला होता. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने राज्याची सर्व सूत्रं राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडे गेली होती. यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीसांनी आपल्या ट्विटर हॅंडलवर ‘मुख्यमंत्री’ पद काढून ‘महाराष्ट्र सेवक’ असं लिहिलं होतं.

Exit mobile version