Sun. Aug 25th, 2019

अजित पवार यांनी गिरीश महाजन यांची ‘नाच्या’शी तुलना करत टीका!

0Shares

जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्यसभेत घेतल्यावर देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. राज्यसभेत अमित शाह यांनी निर्णय जाहीर केल्यावर भाजप, शिवसेनेच्या नेत्यांनी कुठे पेढे वाटून तर कुठे नाचत गात आनंद साजरा केला. यामध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हेदेखील मोठ्या जोषात नाचताना पाहायला मिळत होते. मात्र त्यांच्या या नाचण्यावर टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘शिवस्वराज्य यात्रे’दरम्यान टीका केली आहे.

काय म्हणाले अजित पवार?

नाशिकमध्ये पूर आला आहे. अशा परिस्थितीत मंत्रीमहोदय नाचत आहेत.

हे ‘नाच्या’चं काम तुमचं नाही मंत्री महोदय, अशा खरमरीत शब्दांत अजित पवार यांनी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे.

आज नाशिकमध्ये लोक अडचणीत आहेत. त्यांना मदतीची गरज आहे.

जनता पुरात आहे, आणि मुख्यमंत्री प्रचारात आहेत, अशा प्रकारची टीका अजित पवार यांनी केली आहे.

महाजन यांची प्रतिक्रिया

अजित पवार यांच्या या वक्तव्यावर नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जामनेर येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना महाजन यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलं.

अजित पवारांना मला हे सांगायचं आहे गेले तीन दिवस मी नाशिक मध्ये तळ ठोकून होतो.

कंबरभर पाण्यात फिरत होतो. पूरग्रस्त भागातील मी स्वतः फिरत होतो त्यामुळे आम्हाला परिस्थितीचे गांभीर्य होते.

आपल्या सत्तेच्या काळात आपण किती गांभीर्य ओळखून होते, हे आम्हाला चांगलं माहिती आहे असा टोमणा गिरीश महाजन यांनी मारला.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *