Tue. Sep 28th, 2021

शिवस्वराज्य यात्रेच्या जाहीर सभेत अजित पवार यांची सरकारवर टीका

आघाडीच्या काळामध्ये कामगारांना लागलेल्या नोकऱ्यांतून आता कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढलं जातंय. आमच्या आघाडीच्या काळात आर आर पाटलांनी 5 वर्षात 65 हजार तरुणांना पोलिसांत नोकऱ्या दिल्या. तुमच्या इथलाही पोलिसात तरुण लागला असेल, आता सांगा फडणवीस सरकारच्या पाच वर्षांत पोलीस भर्ती झाली का हो ? असा सवाल जनतेशी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी हिंगोली जिल्हातील ताकतोडा शिवस्वराज्य यात्रेच्या जाहीर सभेत केलाय.

राज्यात सुशिक्षत बेरोजगारांना नोकऱ्या नाही. कामगारांना काम  नाही. शेती मालाला भाव नाही, सामान्य जनता महागाईने त्रस्त झाली. आता तर कामगारावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

आजच पारले ग्लुकोज बिस्कीटच्या कंपनीतून 10 हजार कामगारांना कमी करण्यात आलं.

तसंच पुणे इथली महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतून 14 हजार कामगार कामावरून काढण्यात आलंय. आता करायचं काय?

‘मंदी संकटाला कारणीभूत हे दळभद्री सरकार आहे. यांना लाज वाटली पाहिजे. जनतेसमोर देवेंद्र फडणवीस महाजनदेश यात्रा घेऊन येत आहे,’ अशी बोचरी टीकाही या वेळी केलीय. या सरकारला खाली खेचायचं काम या वेळी तुम्ही करा, हे सांगण्यासाठी तुमच्या गावात आलो असल्याचं सांगितलं.

या वेळी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे, आमदार रामराव वडकुते आदी उपस्थिती होते या वेळी शेतकरी, महिला, व्यापारी तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *