‘शक्य आहे त्यांनी स्वखर्चाने लस घ्यावी’

राज्यात एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे, तर दुसरीकडे कोरोना लसीकरणदेखील सुरु आहे. १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस घेता येणार आहे. या कोरोना लसीकरणासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे.

‘कोरोना प्रतिबंधक लस खरेदी करण्यासाठी आम्ही ग्लोबल टेंडर काढणार आहोत. टेंडरमध्ये सर्व लस कंपन्यांचा उल्लेख केला जाणार आहे. त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. तरी ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वखर्चाने लस घ्यावी’, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

‘राज्यातील मोफत लस संदर्भात एक मे रोजी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. लशींच्या पुरवठ्याबाबत मुख्यमंत्री स्वतः सिरमचे अदर पुनवाला यांच्याशी बोलले आहेत. राज्य सरकारनेही लसीकरणाच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत लसींचा पुरवठा कसा होतो हे पाहावे लागेल. आम्हीही लसीसंदर्भात नागरिकांना आवाहन करणार असून ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वखर्चाने लस घ्यावी’, असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.

संपादन: सिद्धी भरत पाटील

Exit mobile version