Sun. Jun 20th, 2021

…म्हणून राजीनाम्याचं कारण सांगताना रडले अजित पवार

NCP Leader Ajit pawar

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला . कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने ईडीत जाणार नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केलं. त्यातच अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांचा राजीनामा दिला आहे. काल शरद पवार  यांनी पत्रकार परिषद घेत, माझ्यावर होणाऱ्या ईडीच्या कारवाईमुळे अस्वस्थतेतून अजित पवार यांनी राजीनामा दिल्याचं त्यांनी सांगितलं. अजित पवार मात्र या संपूर्ण काळात अज्ञातवासात होते.

आज मात्र अजित पवार जनतेसमोर आले. पत्रकार परिषद घेत त्यांनी राजीनाम्याचं कारण स्पष्ट केलं. यावेळी धनंजय मुंडे, छगन भुजबळ, जयंत पाटील, दिलीप वळसे – पाटील देखील उपस्थित होते. याेवेळी बोलताना अजित पवार भावूक झाले तर त्यांना अश्रू अनावर झाले आहेत.

 

काय म्हणाले अजित पवार?

मी काल राजीनामा अचानक दिला, त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना व सहकाऱ्यांना वेदना झाल्या. मी  राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सहकाऱ्यांना विचारले असते तर त्यांनी राजीनामा देऊ नये असा त्यांचा पवित्रा असता. यासाठी त्यांची माफी मागतो.

साहेबांमुळे मी इथपर्यंत पोहचलो. आपल्यामुळे साहेबाना त्रास झाला म्हणून मी अस्वस्थ झालो.

कुणालाही न सांगता माझ्या कुटुंबप्रमुखालाही न सांगता मी राजीनामा दिला.

त्यानंतर मी फोन बंद केला आणि नातेवाईकांच्या घरी होतो.

मी काल मुंबईत नातेवाईकाकडे होतो.

शरद पवार यांचे राज्य सहकारी बँकेशी संबंध नाही.

मात्र शरद पवार यांचं नाव माझ्यामुळे घेतलं जाऊ लागलं. या बातम्यांमुळे मी अस्वस्थ झालो. माझ्यामुळे शरद पवार यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्यामुळे मी शरद पवार यांनाही न सांगता राजीनामा दिला.

काल मी अचानक राजीनामा दिला. त्यांमुळे  सहकाऱ्यांना न विचारता राजीनामा दिला.

माझ्या राजीनाम्यामुळे जे दुखावले त्यांची माफी मागतो.

मी हरिभाऊ बागडे यांना तीन दिवसांपुर्वी फोन केला होता

ती चूक होती की नाही माहीत नाही

विवेकबुद्धीला स्मरुन मी राजीनामा दिला

राज्य सरकारी बॅकेंमध्ये ठेवी १२ हजार कोटी असताना२५ हजार कोटीचा भ्रष्ट्राचार कसा होऊ शकतो, असा माझा सवाल आहे?

हरिभाऊ बागडे यांना तीन दिवसांपुर्वी फोन केला होता.

हरिभाऊ बागडे यांचे पी ए सागर यांच्याकडे राजीनामा दिला

अजित पवार रडले!

बरेच नेते राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून गेले, एकावरही टीका केली नाही.

ह्या नेत्यांना आम्ही जवळ करु शकलो नाही त्याचे वाईट वाटत आहे.

आज ही शरद पवार सांगतील तोच निर्णय होतो.

आमच्या घरात काही गृहकलह नाही. माझ्यावर 70 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप झाला.

त्यामुळे मी नाराज झालो, हे सांगताना अजित पवार यांना अश्रू अनावर झाले.

पाच वर्षांपासून चौकशी सुरू आहे, किती वर्ष चौकशी होणार आहे?

निवडणुकीमध्ये चौकशीबाबत चर्चा होत आहे. लोकं बोलतील अजित पवार यांना हजारशिवाय जमत नाही.

आम्ही राजकारणात असले तरी आम्हालाही भावना आहेत

आज ही शरद पवार सांगतील तोच निर्णय

आमच्या घरात काही गृहकलह नाही

माझ्यावर 70 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप झाला

आज ही शरद पवार सांगतील तोच निर्णय

आमच्या घरात काही गृहकलह नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *