Tue. Jun 2nd, 2020

अजित पवार यांचा शरद पवारांना ‘घरचा आहेर’

लोकसभा निवडणुकीचे निकाल काही दिवसातच जाहीर होणार असून विरोधक EVM मशीनबाबत शंका व्यक्त करत आहेत. EVM मशीनची तपासणी करावी अशी मागणी राजकीय नेत्यांनी केली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी EVM मशीनच्या निकालावर विश्वास नसल्याचे म्हटलं होतं. मात्र राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी EVM बाबत शंका नसल्याचे म्हटलं आहे. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

काय म्हणाले अजित पवार ?

EVM मशीनमध्ये दोष असता तर पाच राज्यांत भाजपाचा पराभव झाला नसता.

EVMविषयी मला शंका नसल्याचे अजित पवार म्हणाले.

मात्र आधीपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत शंका व्यक्त केली होती.

अजित पवारांनी शंका नसल्याचे सांगितल्यामुळे मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

तसेच पवार कुटुंबात मतभेद असल्याची चर्चा सुरू आहे.

यापूर्वीही विरोधकांनी EVM मशीनबाबत न्यायालयात धाव घेतली आहे.

एकाच पक्षातील नेते दोन्ही भूमिका मांडत असल्यामुळे मोठा सवाल उपस्थित झाला.

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *