Tue. Jun 28th, 2022

‘शिवसेना पक्षप्रमुख बंड घडवणे शक्य नाही’

शरद पवार यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. या  बैठकीत राष्ट्रवादीचे अजित पवार, जयंत पाटील आणि आणि अनेक मंत्री  उपस्थित होते. राष्टवादीच्या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेताली होती. अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत नमूद केलेल्या सर्व महत्त्वपूर्ण विधानाने ट्रोलर्सच्या वावड्यांना पूर्णविराम दिला आहे. याशिवाय अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत वळसे-पाटलांवर टीकासुद्धा केली आहे. तसेच आम्ही सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत असे वक्तव्य पवारांनी केले आहे. ‘आम्ही शेवटपर्यंत शिवसेना आणि उद्धव ठाकरेंसोबत आहोत,तसेच हे सरकार टिकवण्यासाठी प्रयत्न करू’ असेसुद्धा त्यांनी म्हटले आहे. त्याशिवाय अजित पवारांवर झालेले सर्व आरोप त्यांनी फेटाळले.

अजित पवारांचे महत्त्वपूर्ण विधान 

‘सरकार टिकवण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील’

‘राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्याना पाठींबा’

‘शिवसेना मविआतून बाहेर पडणार नाही’

‘शिवसेनेच्या बंडामागे भाजपाची भूमिका दिसत नाही’

‘शिवसेना पक्षप्रमुख बंड घडवणे शक्य नाही’

‘निधी वाटपात  अन्याय केला नाही’

‘बंडाची कल्पना न मिळणे हे गृहखात्याचे अपयश’

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.