Wed. Jun 16th, 2021

इंदू मिलमधील आंबेडकर स्मारक दोन वर्षांत पूर्ण करणार- अजित पवार

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या स्मारकाचं काम 2 वर्षांत पूर्ण करू, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिलं आहे. तसंच या स्मारकासाठी लागेल तेवढा निधी देण्याचं आश्वासनही अजित पवार यांनी दिलं आहे.

इंदू मिलमधील (Indu Mill) आंबेडकर स्मारकाचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून रेंगाळला आहे.

2015 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या स्मारकाचं भूमिपूजन केलं होतं.

हे स्मारक 14 एप्रिल 2020 पर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिलं होतं.

2 जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी 2022 पर्यंत स्मारकाचं काम पूर्ण करणार असल्याची घोषणा केली आहे.

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर काय म्हणाले अजित पवार?

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या (Farmers) पाठीशी आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल आपण जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार आहोत, असं अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *