पुन्हा अजित पवार भाजपासोबत यावेत – राधाकृष्ण विखे

भाजपा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा भाजपात येण्यासाठी साद घातली आहे. राज्याच्या हितासाठी अजित पवार पुन्हा भाजपासोबत येण्याची इच्छा राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे. मात्र, भाजपाकडून राधाकृष्ण विखेंच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष होत आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्कर श्रोत्री यांनी विखे पाटलांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी नेत्यांचे गुणविशेष आणि सल्ला या प्रश्नावर अजित पवार पुन्हा भाजपासोबत यावेत, अशे वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी, हा अजूनही राज्याच्या चर्चेचा विषय असतो, असेही राधाकृष्ण विखे म्हणाले. तर मविआमुळे राज्यातील शेतकरी, सामान्य माणूस त्रासला आहे. त्यामुळे राज्यात भाजपाची सत्ता येणं आवश्यक असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.