Fri. Aug 12th, 2022

अजित पवारांची १००० कोटींची संपत्ती जप्त होणार; आयकर विभागाची नोटीस

  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली आहे. देशमुख यांच्या अटकेनंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची १००० कोटींची संपत्ती जप्त करण्याची नोटीस आयकर विभागाने दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला लागोपाठ दुसरा झटका सहन करावा लागणार आहे.

  आयकर विभागाने अजित पवार यांच्याशी संबंधित ५ संपत्ती जप्त करण्याची नोटीस दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवारांवर बेनामी पद्धतीने संपंत्ती गोळा करण्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच त्यांच्या कुटुंबियावरदेखील आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

  अजित पवार यांचे जावई आणि कुटुंबातील सदस्यांच्या खात्यात कोट्यवधी रुपये जमा केले असल्याची माहिती भाजप नेते किरिट सोमय्या यांनी दिली. तसेच सोमय्यांनी दावा केला आहे की, अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांचे नरिमन पॉइंट येथील निर्मल इमारतीतील कार्यालय आणि अजित पवार यांच्या आई, पत्नी, बहिणी, जावई यांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत.

अजित पवारांच्या ‘या’ संपत्तीवर कारवाईचे आदेश

जरंडेश्वर साखर कारखाना – ६०० कोटी

राज्यात २६ ठिकाणी जमीन – ५०० कोटी

गोव्यातील हॉटेल – २०० कोटी

पार्थ पवारचे कार्यालय – २५ कोटी

नवी दिल्लीमधील फ्लॅट – २० कोटी

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.