अजित पवारांच्या मुळशीतील फार्महाऊसला भीषण आग; लाखोंचे नुकसान

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्या मुळशी तालुक्यातील घोटेवडे येथील फार्महाऊसला भीषण आग लागली होती. रात्री 10 वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले आहे. ही आग रविवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास लागल्याची माहिती समोर आली आहे. शॉक सर्किटमुळे फार्महाऊसला आग लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या आगीत फार्महाऊस जळून खाक झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

नेमकं काय घडलं ?

माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्या मुळशीच्या फार्महाऊसला भीषण आग लागली.

अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर रात्री 10 वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे.

रविवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास लागल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिकी मिळताच हिंजवाडी एमआयडीसी अग्निशमन विभागातून तीन बंब घटनास्थळी दाखल झाला.

यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नसल्याचे समजते आहे.

 

 

Exit mobile version