Sun. Jun 13th, 2021

31 मार्च नव्हे, तर पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार- अजित पवार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन कोरोनापासून बचाव करण्यासाठी गर्दी टाळण्याचं आवाहन केलं आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर ही महानगरं बंद ठेवण्याचंही त्यांनी आवाहन केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता पत्रकार परिषद घेऊन मुंबई, मुंबई उपनगरं, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, ठाणे , रत्नागिरी ही शहरं बंद ठेवणार असल्याचं स्पष्ट केलं. एवढंच नव्हे, तर केवळ 31 मार्चपर्यंतच नव्हे तर पुढील आदेश येईपर्यंत महानगरं बंद ठेवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

काय म्हणाले अजित पवार?

बंदचे आदेश 31 मार्च नव्हे, तर पुढील आदेश येईपर्यंत असेल.

विवाह सोहळे आणि अंत्यविधीसाठी गर्दी करू नये.

मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्याचा विचार सरकार करत आहे.

रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना मालकांनी पगार द्यावे.  

ग्रामीण भागातील रुग्णालयं तयार आहे. तसंच कुठेही निधीची कमतरता भासू देणार नाही. यासाठी केंद्राकडे निधी मागायची गरज पडणार नाही. महाराष्ट्र राज्य सक्षम आहे. कुणालाही निधीची अडचण जाणवणार नाही.

खासगी कंपन्यांनी आर्थिक नुकसान महत्वाचं की माणूस न गमावणं याचा विचार करणं गरजेचं आहे. आरोग्याच्या खर्चासाठी तरतूदीदेखील सरकारच जाहीर करणार असंही त्यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *