“ना मी ज्योतिषी आहे ना मी पोपटाला विचारलंय”, अजित पवार यांची प्रतिक्रिया

Exit Poll वर माझा विश्वास नाही. Exit Poll प्रमाणे निकाल लागतील असं मला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली आहे. तसंच छगन भुजबळ यांनीही Exit Poll वर टीका केली आहे.

काय म्हणाले अजित पवार?

मी काही ज्योतिषी नाही आणि मी पोपटालाही विचारलं नाही की आमच्या किती जागा येतील?

कोणी लाडू आणून ठेवावं अथवा आणखी कोणी आणखी काही करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

 

काय म्हणाले छगन भुजबळ?

Exit Pollवर माझा विश्वास नाही.

असं असेल तर पाच संस्थांना सर्व्हे करायला लावा आणि पंतप्रधान निवडा.

निवडणूक घेऊच नका

Exit Poll वाले प्रत्येक ठिकाणी जातात का? हा माझा प्रश्न आहे.

निकाल लवकरच येईल तेव्हा स्पष्ट होईल

EVM मशीनबद्दल शंका आहे. बॅलेट पेपरची मागणी आहे. त्यावर मतदान घ्यायला हवं.

डिजिटल यंत्रणेवर माझा विश्वास नाही.

मोबाईल हॅक होऊ शकतात तर EVMही हॅक होऊ शकतं.

ज्या देशांनी EVM तयार केलं, त्यांनी बदल केला. तर आपण का नाही करत? असा सवाल भुजबळ यांनी केला.

उद्या मतमोजणी आहे. मात्र, मतमोजणी आधीच घेण्यात आलेल्या Exit Pollमध्ये भाजपाची सत्ता येणार असल्याचा दाखवण्यात येत असलं तरी निकालानंतर यासंदर्भात अधिक बोलणं योग्य होईल

देशात अनेक ठिकाणी EVM मशीन संदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे नाशिक मध्ये सुद्धा काही गडबड झाली आहे का याबाबत मला मनात शंका आहे. मतमोजणी संदर्भात मी आज जिल्हाधिकाऱ्यांशी भेट घेऊन माझ्या मनात काही प्रश्न आहेत यासंदर्भात बोलणार आहे।।।।।।।।।

 

जयदत्त क्षीरसागर यांच्यावर काय दिली प्रतिक्रिया?

जयदत्त क्षीरसागर यांनी त्यांच्या कौटुंबिक वादातून राष्ट्रवादी सोडली..विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन ते शिवसेनेत गेले आहेत. ते गेल्यामुळे पक्षाचं नुकसान तर झालंच. अधिक काम करून आम्ही ते नुकसान भरून काढू, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

 

छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया?

स्थानिक राजकारणामुळे क्षीरसागर नाराज होते.

पक्षांनी त्यांच्या तक्रारींवर अनेकदा विचार केला, परंतु त्यांचं समाधान झालं नाही.

मात्र ते थांबले नाही. आत्ताही राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विरोधात काम केलं आहे.

ते शिवसेनेत जात आहेत. त्यांना शुभेच्छा आहे.

आमच्यासाठी ही दुर्दैवी बाब आहे

विकासाच्या मुद्द्यावर आणि मोदींवर असलेली नाराजी यामुळे नाशिकमध्ये परिवर्तन होईल, पाच वर्षात आम्ही विकास केला होता तो पाच वर्षात शून्यावर आणून ठेवलाय मला विश्वास आहे समीर भुजबळ निवडून येतील, तर माघे भुजबळ मराठा विरोधात आहे असे वातावरण करत गैरसमज पसरवला होता मात्र तो आता दूर झाला आहे, शिवसेना आणि भाजप हे एकमेकांत भिडले होते आम्ही एकत्र होतो त्यामुळे विजय आमचा होईल.

Exit mobile version