Mon. May 23rd, 2022

पार्थ पवार यांचा राजकारणाचा श्रीगणेशा?

मावळ लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार पार्थ पवार यांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी ‘मोरया गोसावी’ गणपतीची आरती केली. त्यानंतर शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती, तरुण, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना भेटून आढावा घेतायेत. त्यांच्या या गाठीभेटींमुळे चर्चेला उधाण आलंय.

गेल्या महिन्यापासून मावळ चांगलंच तापलेलं दिसून येतंय. खास करून तेव्हा जेव्हा अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांची शहरभरात पोस्टरबाजी झाली. आजोबा शरद पवार यांच्या जन्मदिनाच्या पोस्टरवरही पार्थ पवार चमकला आणि इथूनच पार्थ मावळ मधून लढणार असल्याचं चित्र दिसू लागलं. त्यानुसार पार्थ मावळमध्ये सक्रिय झाल्याचंदेखील दिसून येतंय.

पार्थ पवार मावळमधून लढणार?

पार्थ पिंपरी चिंचवडमध्ये सकाळी पार्थने मोरया गोसावीचे दर्शन घेत आपला श्रीगणेशा केल्याची चर्चा शहरभर चालू आहे.

भर दुपारी शहरातील काही कॉलेजला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवादही साधलाय.

गेल्या महिन्याभरापासून पार्थ पवार हे मावळ लोकसभा संघातील विविध कार्यक्रमाला हजेरी लावताना दिसून येत आहेत.

मावळ तालुकाध्यक्ष बबन भेगडे यांच्या निवासस्थानी मावळ लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत त्यांना विचारलं होतं.

त्यावेळी पक्षाने संधी दिल्यास लढण्यास तयार असल्याचे पार्थने स्पष्ट केलं होतं.

पार्थ पवारांच्या गाठीभेटीने मात्र विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मावळ शिवसेना खासदार श्रीरंग बारणे असतील, किंवा भाजप शहर अध्यक्ष लक्ष्मण जगताप.

सर्वांच्या मनात नक्कीच धडकी भरली असणार हे मात्र खरंच म्हणावं लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.