Fri. May 7th, 2021

‘मी टोपी आणि शिट्टी देतो, मग करा चौकीदारी’- अकबरूद्दीन ओवैसी

निवडणुकीच्या तोंडावर चौकीदार शब्दाला चांगलंच वजन पाहायला मिळालंय. एकीकडे BJP नेते “मै भी चौकीदार”चा नारा देत आहेत. आपल्या Twitter वरील नावाआधी ‘चौकीदार’ अशी उपाधी लावत आहेत. तर दुसरीकडे विरोधक “चौकीदार चोर है” अशी नारेबाजी करत आहेत. अशातच आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल नेहमी चर्चेत असणारे MIM पक्षाचे नेते आणि असदुद्दीन ओवैसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांनी मोदींवर पुन्हा निशाणा साधला आहे.

 काय म्हणाले अकबरुद्दीन ओवैसी?

नरेंद्र मोदी नेमके आहेत तरी कोण, असा सवालच ओवैसी यांनी विचारला आहे.

मोदी आपण चहावाला असल्याचं सांगतात.

गेल्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी चहावाला बनून जनतेची दिशाभूल केली.

मी तेव्हा म्हटलं होतं की मी त्यांना चुल आणि किटली आणून देईन, त्यांनी आमच्यासाठी चहा बनवावा.

मोदी कधी नाल्याजवळील गॅसवर पकोडे बनवतात.

आता लोकसभा निवडणुका आल्यावर ते चौकीदार बनले आहेत.

मीच त्यांना टोपी आणि शिट्टी आणून देतो.

मग त्यांनी टोपी घालून आणि गळ्यात शिट्टी बांधून खुशाल चौकीदारी करावी.

 

अकबरूद्दीन ओवैसी यांनी मोदींवर अनेकवेळा जहाल टीका केली आहे. यापूर्वी एकदा सर्व हिंदूंचं हत्याकांड करण्यासंदर्भात केलेलं जाहीर भाषणातील विधान वादग्रस्त ठरलं होतं. तसंच मोदी हैदराबादमध्ये आल्यास त्यांना हाकलून देऊ असंही ते एका भाषणात म्हणाले होते. तर योगी आदित्यनाथ यांची भगवी वस्त्रं म्हणजे जोकरासारखे कपडे असल्याचंही विधान त्यांनी केलं होतं. आता मोदींच्या चौकीदार या बिरूदावरून ओवैसी यांनी टीका केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *