Mon. Jun 1st, 2020

अखिलेश यादव यांच्या ताफ्यातील 175 गाड्यांचा तोल न भरताच प्रवास

वृत्तसंस्था, उत्तर प्रदेश

 

माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या गाड्यांच्या ताफ्याने एकही रुपया न देता टोलनाका ओलांडल्याचा प्रकार उत्तर प्रदेशमधील बाराबांकीमध्ये घडला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

 

धक्कादायक बाब म्हणजे, अखिलेश यांच्या ताफ्यातील एक दोन नव्हे तर तब्बल 175 गाड्यांनी टोल न भरता प्रवास केला. सामान्य व्यक्तींना टोल भरण्यासाठी टोल नाक्यावर बराच वेळ थांबावं लागते.

 

मात्र, अखिलेश यादव यांच्या वाहनांचा ताफा टोल न भरता अगदी सुसाट निघून गेला. समाजवादी पक्ष सत्तेत असताना अहमदपूर टोलनाका अनेकदा चर्चेत होता. समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी अनेकदा या टोलनाक्यावर धुडगूस घातला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *