Mon. Aug 8th, 2022

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूकीबाबत अखिलेश यादव यांची घोषणा

  उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष कसून तयारीला लागले आहेत. दरम्यान उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मोठी घोषणा केली आहे. उत्तरप्रदेशमधील आगामी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा अखिलेश यादव यांनी केली आहे.

  उत्तरप्रदेशमध्ये आगामी निवडणूक २०२२ लवकरच पार पडणार आहेत. अशातच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आगामी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली. अखिलेश यादव हे आझमगडमध्ये समाजवादी पक्षाचे खासदार आहेत. अखिलेश यादव म्हणाले, ‘उत्तर प्रदेशची आगामी विधानसभा निवडणूक मी लढणार नाही. राष्ट्रीय लोकदलासोबत युती करून आम्ही निवडणूक लढवणार आहोत. तसेच दोन्ही पक्षातील जागावाटप निश्चित झाले असल्याचे अखिलेश यादव यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.