Wed. Jun 29th, 2022

अखिलेश यादव यांचे सूचक ट्विट, म्हणाले…

देशातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाब विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. तर देशातील सर्वात मोठे राज्य असलेले उत्तर प्रदेशच्या विधासभेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपा बाजी मारते करते की समाजवादी पक्ष झेंडा फडकवतो, हे थोड्याच वेळात जाहीर होणार आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी सूचक ट्विट केले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये भाजप आणि समाजवादी पक्षामध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे. उत्तरप्रदेशमध्ये भाजप आघाडीवर असून समाजवादी पक्षाने विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान, उत्तरप्रदेश विधानसभेची मतमोजमी सुरु असताना अखिलेश यादव यांनी ट्विट केले आहे. त्यांनी ट्विट केले की, ‘कसोटी अद्याप बाकी आहे. निकालाची वेळ आली आहे. मतमोजणी केंद्रावर दिवसरात्र ठाण मांडून बसलेले कार्यकर्ते, समर्थक, नेते, पदाधिकारी आणि हितचिंतकाचे आभार. लोकशाहीच्या रक्षकांनी विजयाचे प्रमाणपत्र घेऊन परतावे.’, असे त्यांनी ट्विट केले.

उत्तर प्रेदशमध्ये मतमोजणी सुरू झाली असून भाजप आघाडीवर आहे. तर समाजवादी पक्षानेही ९२ जागा मिळवल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.