Mon. Oct 25th, 2021

…म्हणून राष्ट्रीय कराटेपटु बनला दुचाकी चोर

जय महाराष्ट्र न्यूज, अकोला

 

अकोल्यात दुचाकी चोरीप्रकरणी  दोन युवकांना अटक केली.  पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये श्रेयश सुरेश ठाकरे आणि अक्षय मनोज मसने या तरूणांचा समावेश आहे.

 

श्रेयश हा प्रतिष्ठित घरातील मुलगा असून, तो राष्ट्रीय कराटेपटू आहेय. ऐशोआराम आणि  झटपट पैसा कमाविण्याच्या लालसेनं श्रेयश आणि त्याच्या मित्रानं हा दुचाकी

चोरीचा गोरखधंदा सुरू केला होता.

 

रणपिसे नगरातील आकाश तायडे यांनी आपली दुचाकी अपार्टमेंटमधून चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आलीये. श्रेयसने काही

दिवसांपुर्वीच राष्ट्रीय कराटे स्पर्धेत आपल्या संघाला पदक मिळवून दिलं होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *