Fri. Nov 15th, 2019

…आणि चोरट्याने पळ काढला

तुम्ही आतापर्यंत सोने-चांदी, पैसे, मोबाईल या वस्तू चोरीला गेल्याचे ऐकले असलेच मात्र इथे चक्क एसटी चोरल्याची घटना घडली आहे. 

राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला बस स्थानाकातून एम.एच BT-0642 या क्रमांकाची एसटी बस चोरून नेत असताना मंगरुळपीर-वाशिम रोडवर गोलवाडी फाट्याजवळ एसटी रस्त्याच्या कडेला उतरल्याचा प्रकार उघडकीस आला. 

मात्र एसटी खाली उतरल्यामुळे चोरटा एसटी सोडून फरार झाल्याची घटना घडली आहे. याची माहिती मिळताच अकोला बस व्यवस्थापक यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने बस बाहेर काढण्यात आली असल्याची माहिती आगार व्यावस्थापक आर.एन.एवलेकर यांनी दिली आहे.     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *