Fri. Jul 30th, 2021

अकोला जिल्हा परिषदेवर भारिपचे अध्यक्ष-उपाध्यक्ष

भारीपला जिल्हा परिषदेवरील सत्ता राखण्यास यश आले आहे. भारीपने अकोला जिल्हा परिषदेवर पाचव्यांदा विजयी झेंडा फडकावला आहे.

भारिपचे प्रतिभा भोजने यांची जिल्हा परिषद अध्यक्ष तर सावित्री राठोड यांची उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे.

अकोला जिल्हा परिषदेसाठी आज शुक्रवारी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली.

अध्यक्षपदाची निवडणूकीत प्रतिभा भोजने यांनी २५ विरुद्ध २१ अशा फरकाने विजय मिळवला.

तसेच उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सावित्री राठोड यांनीही २५ विरुद्ध २१ विजय मिळवला.

प्रतिभा भोजने या तेल्हारा तालुक्यातील भांबेरी मतदारसंघातून जिल्हा परिषदेवर निवडून आल्या आहेत.

तर उपाध्यक्षपदी निवड झालेल्या सावित्री राठोड या पातूर तालुक्यातील चोंढी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

या विजयानंतर समर्थकांनी एकच आनंद व्यक्क केला.

एकूण ५३ सदस्य

पक्षनिहाय निवडून आलेले सदस्य

भारिप-बमसं २५ (पुरस्कृतांसह)
शिवसेना १३
भाजप ०७
कॉंग्रेस ०४
राष्ट्रवादी कॉंग्रेस ०३
अपक्ष ०१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *