Wed. Jun 26th, 2019

प्रसिद्ध गायक Akon मराठीतून गाणं गाणार ?

0Shares

जगप्रसिद्ध गायक एकॉन नेहमी त्याच्या हटके गाण्यांसाठी प्रसिद्ध असून त्याची अनेक गाणी रसिकांच्या मनात अजूनही घर करून आहेत. रा-वन चित्रपटातील छम्मक छल्लो या गाण्यातून एकॉनने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. तसेच या गाण्यानेच एकॉनला भारतात प्रसिद्धी मिळवून दिली. त्यामुळे भारतीयांसाछी अजून एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे एकॉन लवकरच मराठीतून गाणं गाणार असल्याचे समजते आहे. मात्र ही अद्याप अधिकृत माहिती नसल्याचे स्पष्ट होत आहे.

नेमकं प्रकरण काय ?

महाराष्ट्रतील एका डिजीटल मार्केटिंग कपंनीच्या माध्यामतून एकॉनचं गाणं रसिकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटलं जात आहे.

या कंपनीचे मालक अक्षय गिरमे यांनी हे गाणं तयार करणार असल्याचे म्हटलं आहे.

एकॉनचे हिंदी गाणं सुपरहिट होऊ शकत तर मराठीतही होणार, असा विश्वास अक्षय गिरमे यांनी दर्शवला आहे.

एकॉनने अनेक सुपरहिट गाणी गायल्या आहेत.

त्यामुळे हिंदी एवढेच मराठी गाणं गाजणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मात्र यासंदर्भात माहिती अद्याप अस्पष्ट आणि अधिकृत नसल्याचे समजते आहे.

 

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: