Sun. Aug 25th, 2019

अक्षरा हासनने आपल्या ‘त्या’ लीक फोटोंवर दिली प्रतिक्रिया!

0Shares

अभिनेता कमल हासन यांची धाकटी मुलगी आणि श्रुती हासनची बहीण अक्षरा हासन ही सायबर गुन्ह्याची बळी ठरली आहे. अमिताभ बच्चन आणि धनुषसोबत ‘षमिताभ’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये काम केलेल्या अक्षरा हिचे अंतर्वस्त्रातील फोटो व्हायरल झाले आहेत. तिने आपल्या खोलीमध्ये काढलेले फोटो चक्क सोशल मीडियावर पसरले. या गोष्टीमुळे तिला प्रचंड धक्का बसला आहे. अखेर तिने या प्रकरणावर आपलं मौन सोडलं आहे.

“मला या गोष्टीचं खरंच खूप दुःख होतंय, एकीकडे #MeToo सारख्या चळवळीतून जागृती होत असताना दुसरीकडे असे लोक आहेत जे आपल्या स्वार्थासाठी एखाद्या मुलीचे खासगी फोटो इंटरनेटवर लीक करतात.”

या प्रकरणी अखेर अक्षराने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *