Tue. Oct 26th, 2021

आपल्या Birthday निमित्त अक्षयकुमारची फॅन्सना भेट, ‘पृथ्वीराज’चा टिझर रिलीज!

आज बॉलिवूड स्टार अक्षय कुमार याचा 52 वा वाढदिवस आहे. यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून आज त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यावर अक्षय कुमारने रिटर्न गिफ्ट म्हणून पृथ्वीराज या त्याच्या नवीन चित्रपटाचा टिझर रिलिज केला आहे.

बॉलिवूड स्टार अक्षय कुमार याचा आज 52 वा वाढदिवस आहे. एकामागे एक सुपरहिट सिनेमे देणारा अक्षय कुमार सध्याचा आघाडीचा स्टार आहे. सध्या देशभक्ती आणि सत्यकथांवर आधारित सिनेमांची मालिकाच करणाऱ्या अक्षय कुमारने वाढदिवसानिमित्त आपल्या आगामी सिनेमाचा टिजर Twitter वर रिलीज केलाय.

सोशल मीडियावर आज अक्षय कुमारवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अक्षय कुमारनेही त्याला प्रतिसाद देताना चाहत्यांना ‘रिटर्न गिफ्ट’ म्हणून ‘पृथ्वीराज’ या आपल्या आगामी सिनेमाचा टिझर रिलिज केलाय.

मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी माझा पहिला पिरियड ड्रामा आहे. मी स्वतःला खूप नशीबवान मानतो, की मला या सिनेमात महत्वाचा रोल मिळाला. हा चित्रपट माझ्या सर्व मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे. ‘यशराज फिल्म’ ने या सिनेमाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अक्षय कुमारच्या कारकीर्दीतला हा पहिला ऐतिहासिक सिनेमा आहे. ज्यात अक्षय कुमार मध्ययुगीन इतिहासातील राजा पृथ्वीराज चौहनची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केलंय.  दूरदर्शनवरील ‘चाणक्य’, ‘उपनिषद गंगा’ या मालिकांप्रमाणेच ‘पिंजर’ आणि ’21 तोफों की सलामी’ या सिनेमांचं दिग्दर्शन केलंय.

या टिझरला फॅन्सची पसंती मिळतेय. Bollywood च्या अनेक स्टार्सनी देखील अक्षयचं हे ट्विट retweet केलंय.

अभिनेत्री तापसी पन्नूने Retweet करत ‘सॉलिड’ अशी कमेंट केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *