Tue. Oct 26th, 2021

2019 मध्ये अक्षय कुमारने बॉक्स आॉफिसवर रचला ‘हा’ इतिहास

2019 च संपूर्ण वर्ष अक्षय कुमारने (Akshay Kumar) चांगलचं गाजवल. वर्षभरात बॉक्स ऑफिसवर (Box Office) 700 कोटींची कमाई करत वर्षभरात सर्वाधिक कमाई करणारा अक्षय पहिला अभिनेता ठरला आहे. 2019 साली अक्षय कुमारचे 4 सिनेमे रिलीज झाले. या सर्वच सिनेमांनी 100 कोटींचा टप्पा सहज पार पाडला. उलट त्यापुढे जात एकूण कमाई 700 कोटींची केली.

अक्षयचे 2019 मध्ये रिलीज झालेले सिनेमे

केसरी (Kesri)- 154.41 करोड

मिशन मंगल (Mission Mangal) – 202.98 करोड

हाऊसफुल 4 (Housefull 4)- 194.60 करोड

गुड न्यूज (Good Newws)- 162.10 करोड (लेटेस्ट रिलीज)

या रेकॉर्डमुळे अक्षय कुमार सध्या बॉक्स ऑफिसचा किंग ठरला आहे.

दुसऱ्या क्रमांकावर हृतीक रोशन असून त्याच्या ‘वॉर’ आणि ‘सुपर 30’ या दोन्ही सिनेमांनी मिळून 464.85 करोडचा रेकॉर्ड केलाय. तिसऱ्या स्थानावर टायगर श्रॉफ आहे. तर सलमान खान चौथ्या क्रमांकावर आहे.

याअधी 2017 साली सलमान खानने 500 करोडची कमाई करून रेकॉर्ड बनवला होता. 2018 मध्ये रणवीर सिंगच्या ‘पद्मावत’ आणि ‘सिंबा’ या दोन सिनामांनी 524.46 करोडची कमाई केली होती. मात्र या दोन्ही अभिनेत्यांना मागे टाकत अक्षय कुमारने बॉक्स आॉफिसवर रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *