Wed. Oct 27th, 2021

अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण

राज्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे.दररोज कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढतं आहे. तर, मृत्यूंच्या संख्येतही मोठी वाढ होतआहे. अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वचजण करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला कोरोना झाल्याचे समोर आले आहे. अक्षय सध्या गृह विलगीकरणात आहे.

अक्षयने ट्विट करत आपला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे. “मी सर्वांना हे सांगू इच्छितो की आज सकाळी माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाइन आहे. मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी मी विनंती करतो की त्यांनी स्वत: कोरोना चाचणी करून घ्या आणि काळजी घ्या. लवकरच अॅक्शनमध्ये परत येईल” अशा आशयाचं ट्विट करत अक्षयने त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती सगळ्यांना दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *