Tue. Oct 26th, 2021

अभिनेता अक्षय कुमार ‘या’ गोष्टीवरुन सोशल मीडियावर व्हायरल

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिल रोजी मुंबई आणि उपनगरात पार पडले. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र अभिनेता अक्षय कुमारने मतदान केले नसल्यामुळे तो सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला आहे. यावरुन पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केल्यावर अक्षयने उत्तर देण्यापासून टाळले. मात्र अक्षयने कॅनडाच्या नागरिकत्वाबाबत मौन सौडले आहे.

काय म्हणाला अक्षय कुमार ?

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान मुंबईत पार पडले असून अनेक दिग्गज कलाकारांनी मतदान केले आहे.

मात्र अभिनेता अक्षय कुमारने मतदान केले नसल्यामुळे त्याला सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहे.

अक्षय कुमारने मतदान केले का ? अशा काही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे.

पत्रकारांनी याबाबतीत विचारणा केल्यावर त्याने उत्तर देण्यास टाळले.

मात्र अक्षय कुमारने ट्विटरच्या माध्यमातून ट्विट केले आहे.

माझ्या नागरिकत्वाबाबत एवढी रुची  का दाखवली जात आहे.

त्यामुळे विनाकारण नकारात्मक संदेश पसरवण्यात येत आहेत.

मी माझ्या कॅनडाच्या नागरिकत्वाबाबत कधीही लपवा- छपवी केली नाही.

माझ्याजवळ कॅनडाचा पासपोर्ट असून मी गेल्या 7 वर्षात एकदाही कॅनडाला गेलो नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

मी भारतात काम करतो आणि करही प्रामाणिकपणाने भरतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *