Fri. Sep 30th, 2022

प्रजासत्ताक दिनानिमित्त अक्षयने शेअर केले ‘केसरी’चे पोस्टर

संपूर्ण देशभरात आणि बॉलिवूडमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अभिनेता अक्षय कुमारने आपला आगामी ‘केसरी’ या सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर केले आहे.

हा सिनेमा सारागढीत अफगाणांविरोधात शीख रेजिमेंटच्या लढाईवर आधारित आहे. गेल्यावर्षी या सिनेमाची शूटिंग सुरू करण्यात आले होते.

आता हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. येत्या 21 मार्च रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अक्षय कुमारने केसरीचे पोस्टर शेअर करताना म्हटलं की, ‘हॅप्पी, रिपब्लिक डे’. हा आपला 70 वा प्रजासत्ताक दिन. परंतु, आपले जवान देशासाठी कधीपासून लढत आहेत. 122 वर्षाआधी 21 शीखांनी 10 हजार अफगाणी हल्लेखोरांविरोधात लढाई लढली होती. केसरीत त्याचीच कथा आहे. 21 मार्च रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

अक्षय कुमारने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये 21 शीख जवान पिरामिडच्या फॉर्ममध्ये बसलेले दिसत आहेत.

या फोटोत अक्षय कुमार केसरी रंगाच्या पगडीत बसलेला दिसत आहे. या सिनेमात अक्षय कुमार, करिना कपूर, दिलजित दोसांज, कियारा आडवाणी यांच्या भूमिका आहेत. हा सिनेमा 21 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.