Wed. Oct 27th, 2021

यूट्यूबरच्या विरोधात अक्षय कुमारने ठोकला ५०० कोटींचा मानहानीचा दावा

अक्षय कुमारने ठोकला ५०० कोटींचा मानहानीचा दावा…

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने याने एका यूट्यूबरवर ५०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे. या यूट्यूबरचे नाव राशिद सिद्दीकी आहे. राशिद याने अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात फेक व्हिडीओ शेअर केले होते.

या व्हिडिओत अक्षय कुमारवर रिया चक्रवर्तीला कॅनडाला जाण्यासाठी मदत केल्याचा आरोप केला गेला होता. शिवाय अक्षय कुमारने सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात गुपचूप महाराष्ट्र सरकारशी संवाद साधला असा देखील आरोप करण्यात आला होता.

अक्षय सुशांतला ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट मिळाल्याने खुश नसल्याचा दावा राशिदने व्हिडीओमध्ये केला होता. मिड डे’ने दिलेल्या वृत्तानुसार चुकीची माहिती फसरवल्या प्रकरणी अक्षय कुमाराने यूट्यूबर विरोधात ५०० कोटींचा मानहानिचा दावा ठोकला आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांचे नाव देखील घेतलं होतं याचा देखील आरोप राशिदवर केला आहे. गेल्या चार महिन्यांत युट्यूबवर राशिदने सुशांतचे फेक व्हिडीओ अपलोड करून तब्बल १५ लाख रुपयांवर कमाई केल्याची माहिती समोर आली आहे.

सुरुवातीला सुशांतच्या मृत्यूशी निगडीत अपलोड केलेल्या व्हिडीओ अधिकाधिक व्ह्यूज मिळत गेल्याने त्याने सप्टेंबर महिन्यात साडेसहा लाखांची कमाई केली होती.राशिदवर बदनामी, सार्वजनिक गैरव्यवहार आणि हेतुपुरस्सर अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *