Sun. Aug 25th, 2019

आता अक्षय साकारणार अजित डोवाल यांची भूमिका

0Shares

सध्या बॉलिवूडमध्ये देशभक्तीचे सिनेमे मोठ्या प्रमाणावर तयार होत आहेत. असे देशभक्तीपर सिनेमे तयार करण्यात अभिनेता अक्षय कुमार सर्वात पुढे आहे. ‘बेबी’, ‘हॉलिडे’,  ‘नमस्ते लंडन’, ‘रुस्तम’, ‘केसरी’, ‘मिशन मंगल’ सारख्या सिनेमांतून देशभक्तीचे नारे लगावण्याचं काम अक्षय वारंवार करत असतो. त्याच्या सिनेमांना प्रतिसादही चांगलाच मिळतोय.  आता आणखी एका सिनेमाची अक्षयला ऑफर आली आहे. हा सिनेमाही देशभक्तीशीच संबंधित आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या biopic मध्ये डोवाल यांची भूमिका करण्याची ऑफर अक्षयला आली आहे.

नीरज पांडे हा सिनेमा दिगदर्शित करणार आहे. अक्षयच्या स्पेशल छब्बीस, बेबी, नाम शबाना या सिनेमांचं दिग्दर्शनही त्यानेच केलं होतं.

अजित डोवाल यांनी RAW साठी सिक्रेट एजंट म्हणून महत्त्वाची आणि धाडसी operations केली आहेत. सध्या ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारही आहेत.

खलिस्तानविरोधातील ‘Operation Blue Star’ मध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.

अनेक वर्षं पाकिस्तानात राहून त्यांनी भारताला महत्त्वपूर्ण माहिती पुरवली.

त्यामुळे अजित डोवाल यांच्या आयुष्यात अनेक धाडसी, रंजक आणि देशभक्तीपर घटनांच्या मालिकाच आहेत. त्यामुळे अक्षय कुमारला पुन्हा एकदा देशभक्तीपर भूमिका करण्याची संधी या सिनेमातून मिळणार आहे.

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *