Sat. Jun 19th, 2021

अक्षय कुमारकडून मुंबई मनपाला ३ कोटीचा निधी

अक्षय कुमार हा नेहमी देशभक्त कलाकार म्हणून ओळखला जातो. कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान अक्षय कुमारने २५ कोटी रुपयांची मदत केली. त्यानंतर आता पुन्हा अक्षय कुमारने मुंबई महानगरपालिकेला ३ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. हा निधी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या  PPE Kit साठी वापरण्यात यावा, अशी इच्छा त्याने व्यक्त केली आहे.

सिनेसमीक्षक तरण आदर्श यांनी Twitter वरून ही माहिती दिली. यापूर्वी अक्षय कुमारने पंतप्रधान सहाय्यता निधीला २५ कोटी रुपयांचा निधी दिला होता. तसंच या कठीण परिस्थितीत अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना ‘दिलसे थँक यू’ म्हटलंय.

अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत त्याने ‘मुस्कुराएगा इंडिया’ हे गाणंदेखील सोशल मीडियावर अक्षय कुमारने केलं आहे. सातत्याने कॅनडियन नागरीक म्हणून त्याची आवहेलना केली जात असते. मात्र त्याचवेळी आपल्या सिनेमांमधून त्याने देशभक्तीच्या कथा सातत्याने दाखवून आपलं भारतप्रेम व्यक्त केलं. मात्र सिनेमापुरतीच आपली देशभक्ती न थांबवता त्याने देशाच्या सैनिकांसाठी मोठं कार्य केलं आहे. तसंच लॉकडाऊनच्या कठीण प्रसंगातही त्याने केलेली मदत महत्त्वाची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *