Sun. Oct 24th, 2021

#KesariTrailer: अक्षय कुमारच्या ‘केसरी’चा दमदार ट्रेलर रिलीज

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षीत सिनेमा ‘केसरी’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

या ट्रेलरमध्ये अक्षय कुमार पुन्हा एकदा एका दमदार अवतारात दिसतोय.

1897मध्ये झालेल्या सारागढी लढाईवर आधारित असलेल्या या सिनेमात अक्षयने ईशर सिंगची भूमिका साकारली आहे.

आपल्या 21 सैनिकांना घेऊन ईशर सिंग 10 हजार अफगाणी सैन्याशी भीडतो. या युद्धातले अनेक प्रसंग आणि अक्षयचे संवाद अंगावर शहारे आणतात.

विशेष म्हणजे ‘मेरी पगडी भी केसरी और जो लहू बहेगा वो भी केसरी’ हा अक्षयचा संवाद अंगावर रोमांच उभे करतो.

‘किसी गोरे ने मुझसे कहा था कि हिदुस्तान में सिफ डरपोक पैदा होते है. ये वक्त जवाब देने का है,’ या संवादाने ट्रेलरची सुरुवात होते.

ट्रेलरमधील युद्धाची दृश्ये अतिशय मार्मिक आहे आणि शिख सरदाराच्या भूमिकेत अक्षयचा ‘धाडसी’ अंदाजही थेट हृदयाला भिडणारा आहे.

अनुराग सिंगने दिग्दर्शित केलेला हा सिनेमा करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनची निर्मीती आहे.

अक्षय कुमारसोबत परिणीती चोप्रा या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

येत्या 21 मार्चला अक्षयचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *