Mon. Sep 27th, 2021

अक्षय कुमारच्या ‘सुर्यवंशी’चा फर्स्ट लूक पाहिलात का ?

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ सिनेमाची चाहत्यांमध्ये प्रंचड उत्सुकता होती.

रोहित शेट्टी दिग्दर्शित सूर्यवंशी या सिनेमात अक्षय एका एसटीएस अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे. रोहित पहिल्यांदा अक्षयसोबत काम करत आहे.

रोहितने आपल्या ‘सिम्बा’ या सिनेमात ‘सूर्यवंशी’ची एक झलक दाखवली होती. ही झलक पाहिल्यानंतर ‘सूर्यवंशी’चे फर्स्ट लूक पाहण्यास चाहते उत्सूक होते.

तर आता ती प्रतीक्षाही संपली आहे. रोहित व अक्षयच्या ‘सूर्यवंशी’चे फर्स्ट लूक रिलीज झाले आहे.

काही तासांपूर्वी ट्रेड एक्स्पर्ट गिरीश जौहर यांनी या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज केला.

अक्षयचा हा फर्स्ट लूक पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

तसेच अक्षयनेही आपल्या ट्विटरवर या सिनेमाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे.

या अ‍ॅक्शन सिनेमात अक्षय एटीएस आॅफिसरची भूमिका साकारतोय.

या सिनेमात अक्षय दहशतवादाविरोधात लढताना दिसेल. मात्र या सिनेमात अक्षयच्या अपोझिट कोण हिरोईन दिसणार, हे अद्यापही समजले नाही.

पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर रोहित व अक्षयचा ‘सूर्यवंशी’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *