Sun. Jun 20th, 2021

अक्षय्यतृतीयेच्या निमित्ताने दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्याचा नैवेद्य

अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. आज अक्षय्यतृतीया असून या मुहूर्तावर सोनं खरेदी केली जाते तर फळांचा राजा आंबा खायला सुरुवात होते. अक्षय्यतृतीयाच्या निमित्ताने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात 11 हजार आंब्याचा नैवेद्य दाखवण्यात आला आहे. तसेच मंदिर परिसरात आकर्षक आब्यांची सजावट करण्यात आली आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सराफा बाजार आणि फळ बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

11 हजार आब्यांचे नैवेद्य –

आज अक्षय्यतृतीया असल्यामुळे सोने आणि फळांचा राजा आंब्याची खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आली आहे.

तसेच पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात 11 हजार आंब्याचा नैवेद्य दाखवण्यात आला आहे.

मंदिर परिसरात आकर्षक आंब्याची सजावट करण्यात आली आहे.

दरवर्षी देसाई बंधू आंबेवाले हे दगडूशेठ गणपती मंदिरात आंब्याचा नैवेद्य दाखवतात.

अक्षय्यतृतीयाच्या निमित्ताने लोकं सोनं खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी करताना दिसत आहेत.

तसेच चंद्र दिसल्यामुळे आजपासून मुस्लीम बांधव 30 दिवस रोजा पकडतात.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *