Tue. Aug 9th, 2022

अल कायदाचा म्होरक्या ठार

अल कायदा संघटनेचा म्होरक्या अयमान अल जवाहिरीला ठार केल्याचा दावा अमेरिकेनं केला आहे. अमेरिकन गुप्तचर यंत्रणा सीआयएनं अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर रविवारी ड्रोन स्ट्राईक केला. त्याच हल्ल्यात जवाहिरी मारला गेला. २०११ मध्ये ओसामा बिन लादेनला कंठस्नान घालण्यात आलं. त्यानंतर अल कायदाला बसलेला हा सर्वात मोठा धक्का आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन म्हणाले, की तो पुन्हा कधीही, पुन्हा कधीही, अफगाणिस्तानला दहशतवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान बनू देणार नाही. कारण तो गेला आहे. आम्ही हे सुनिश्चित करणार आहोत की दुसरे काहीही होणार नाही. हा दहशतवादी नेता राहिलेला नाही. अमेरिकेच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी अल-जवाहरीचा काबूलच्या मध्यभागी असलेल्या एका घरी शोध घेतला. तिथे तो त्याच्या कुटुंबासह लपला होता. राष्ट्रपतींनी गेल्या आठवड्यात या ऑपरेशनला मंजुरी दिली. त्यानंतर रविवारी मोहिम पार पडली. रविवारी सकाळी ६.१८ वाजता हल्ल्यात जवाहिरी ठार केला गेला.

अल जवाहिरी हा ओसमा बिन लादेन यांच्यानंतर अल कायदा या संघटनेचा प्रमुख बनला होता. जवाहिरी याच्यावर अमेरिकेने २५ मिलियन डॉलरचे बक्षीस जाहीर केले होते. २०११ मध्ये पाकिस्तानातील एका प्रांतात ओसामा बिन लादेन याला अमेरिकेने ठार मारले. त्यानंतर जवाहिरी हा ओसमाप्रमाणे संघटनेची जबाबदारी पाहात होता.  ३१ ऑगस् २०११ ला अमेरिकी सैन्याने अफगानिस्तानातून सैन्य हटवल्यानंतर केलेल्या ड्रोन हल्ल्यात जवाहिरी मारला गेला.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.