Tue. Oct 19th, 2021

दक्ष नागरिकांनी पकडलं अंमली पदार्थ विक्रेत्यांना!

नालासोपारा परिसरात पोलिसांच्या नाकावर टिच्चून खुलेआम अंमली पदार्थ विकले जात आहेत. अशाच दोन जणांना आज नालासोपारा तुलिंज परिसरात नागरिकांनी चांगलाच चोप दिला. या घटनेचा व्हिडिओ social media वर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये गांजाची खुलेआम विक्री दिसत आहे. नागरिकांनी या दोघांना चोप देत उठबशा करायला लावत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

काय घडलं नेमकं?

तुलिंज परिसरातील अंबावाडी भागात सर्रास खुलेआम अंमली पदार्थ विकले जात होते.

ही घटना काही दक्ष नागरिकांच्या लक्षात आली.

त्यांनी अंमली पदार्थ विक्रेत्यांवर सतत काही दिवस पाळत ठेवली.

दरम्यान आज संधी साधत नागरिकांनी अंमली पदार्थ विक्रेत्यांना रंगेहाथ पकडून चांगलाच चोप दिला.

यानंतर या दोघांना तुळींज पोलिसांच्या हवाली केलं.

मात्र स्थानिक पोलीस यावर काहीही बोलण्यास तयार नाहीत.

या अंमली पदार्थ विक्रेत्यांमुळे परिसरातील विद्यार्थी, नागरिक विशेषतः महिला त्रस्त होत्या.

अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांकडून महिलांना छेडीच्याही घटना घडल्या होत्या.

मात्र परिसरात इतक्या सर्व घटना घडत असताना पोलीस याबाबत अनभिज्ञ कसे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. अशा गुन्हेगारांवर नागरिकांच्या आधीच पोलिसांनी आवर घालणं आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *